नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत भारतात करोनाचे 11 हजार 919 नवीन रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १,२८,७६२ आहे, जी एकूण प्रकरणांच्या ०.३७ टक्के आहे. हा दर मार्च २०२० नंतरचा सर्वात कमी आहे.
#COVID19 | India reports 11,919 new cases, 11,242 recoveries & 470 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry.
Active caseload 1,28,762 (account for less than 1% of total cases, currently at 0.37% – lowest since March 2020) pic.twitter.com/j1kalBzWas
— ANI (@ANI) November 18, 2021
गेल्या 24 तासांत करोना आजारामुळे 470 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 11हजार 242 लोक करोनामुक्त झाले आहेत. 11 हजार 919 नवीन प्रकरणांपैकी 6 हजार 849 प्रकरणे एकट्या केरळमध्ये मिळाले आहेत. त्याच वेळी, केरळमध्ये गेल्या 24 तासांत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 6 हजार 046 लोक बरे झाले आहेत.