चेन्नई – करोना विषाणूंचा प्रभाव वाढत असल्याने अनेक स्पर्धांना तसेच खेळाडूंना त्याचा फटका बसला आहे. भारताचा ग्रॅण्डमास्टर अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यालाही जर्मनीतच आपला तळ ठोकावा लागला आहे.
एसी बडेन बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीला गेलेल्या आनंदला आपला मुक्काम तिथेच ठेवावा लागत आहे. गेल्या महिन्यापासून आनंद जर्मनीतच आहे. करोनाच्या प्रसारामुळे जर्मनीतही परिस्थिती फारशी चांगली नाही.
अर्थात असे असले तरीही अन्य व्यक्तींपेक्षा आनंदची निवास व्यवस्था उत्तम आहे. तसेच त्याला येथे दैनंदिन कामे करण्यास तसेच बाहेर फिरायला जाण्यास कोणताच प्रतिबंध नसल्याने हा मुक्काम थोडासा सुसह्य असल्याचेही आनंदने एका मुलाखतीत सांगितले आहे.