पुणे – पुणे शहरातील कोविड कचऱ्यात गेल्या आठवडाभरापासून लक्षणीय घट नोंदविली गेली. दैनंदिन तब्बल दीड हजार किलोने घट झाली.
यापूर्वी दररोज सुमारे 5 हजार 500 किलो जमा व्हायचा. गेल्या 8-10 दिवसांपासून हा आकडा घटत असून आता दररोज सुमारे 4 हजार किलो जमा होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
दरम्यान, करोना आता बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने कोविड कचऱ्यामध्ये उल्लेखनीय घट नोंदविली गेली, अशी माहिती तज्ज्ञांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.
डिसेंबरअखेरपर्यंत हे प्रमाण आणखी घटत 2 हजार किलोपर्यंत जाईल, असा अंदाज पालिकेतील एका अधिकाऱ्याने वर्तवला.