चंदिगड – पंजाब सरकारने राज्यातील संचारबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. शनिवारी आणि रविवारी अर्थात वीकेंडला लावले जाणारे लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी अर्थात कर्फ्यू हे दोन्ही निर्णय मागे घेत असल्याचे पंजाब सरकारने जाहीर केले.
राज्यातील रेस्टॉरंट, जीम, बार यांना सशर्त परवानगी देण्यात आली. ज्यांनी करोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस घेतला आहे अशा नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन घालून पंजाब सरकारने रेस्टॉरंट, जीम, बार यांना परवानगी दिली.
लग्न, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रम यासाठी उपस्थितांच्या संख्येचे बंधन आहे. नागरिकांना मास्क घालण्याचे तसेच सोशल डिस्टंस राखण्याचेही बंधन आहे. पंजाब सरकारने जीम, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, स्पा, प्राणीसंग्रहालय, जलतरण तलाव, मॉल, क्रीडासंकुल, संग्रहालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळेल. यासाठी प्रत्येकाला लसचे डोस घेतल्याचा पुरावा सोबत बाळगावा लागेल. मागणी करताच पुरावा दाखवावा लागेल.