नवी दिल्ली – केंद्र सरकारने बुधवारी कोविड संबंधित सुविधा निर्माण करण्याचे काम आता खासगी कंपन्यांना सीएसआर फंडातून करण्यास अनुमती दिली आहे. एखाद्या कंपनीने कोविडसंबंधी सुविधा निर्माण करून दिली तर त्यासाठी त्यांना जो खर्च येईल तो खर्च कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत येणारा खर्च मानला जाणार आहे.
सीएसआर निधी अंतर्गत कंपन्यांनी आपल्या नफ्यातील दोन टक्के भाग हा सामाजिक कार्यासाठी द्यावा, अशी त्यांना सूचना करण्यात आली आहे. या अंतर्गत आता त्यांना मेडिकल ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट बसवणे, व्हेंटिलेटर्स, सिलिंडर्स व अन्य वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून देणे ही कामे करता येणार आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालयाने आज बुधवारी ही अधिसूचना जारी केली आहे. संबंधित कंपन्यांना ही कामे थेट स्वरूपात किंवा सरकारच्या मदतीने करता येणार आहेत.