फाईव्ह स्टार हॉटेलचीही कोविड सेंटर

मुंबई, दिल्लीत खासगी रुग्णालयांचा हॉटेल्सशी करार

नवी दिल्ली, मुंबई (प्रभात वृत्तसेवा) – देशांत गेल्या 24 तासांत दोन लाखांपेक्षा अधिक बाधित आढळले. त्यामुळे अधिकाधिक बाधितांना उपचार मिळण्यासाठी दिल्ली आणि मुंबईतील हॉटेल आणि बंकेट हॉलमध्ये कमी चिंताजनक प्रकृती असणाऱ्या बाधितांवर उपचार करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

मध्यम संसर्ग असणाऱ्या बाधितांवर उपचार करण्यासाठी लक्‍झरियस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याचे रुग्णालयांनी ठरवले आहे. काही खासगी रुग्णालयांनी त्याबाबत फोर स्टार आणि फाइव्ह स्टार हॉटेलांशी करार करून तेथे उपचाराची सोय निर्माण केली आहे. अर्थात अशा ठिकाणी दाखल होण्यासाठी डॉक्‍टरची परवानगी आवश्‍यक आहे.

ज्या करोना बाधितांना वैद्यकीय मदतीची अत्यंत कमी गरज आहे. त्यांना या हॉटेलच्या सुविधेचा वापर करता येईल. त्या हॉटेलाना खासगी रुग्णालयांचा विस्तारित कक्ष म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. अशा हॉटेलमध्ये करोनासाठी किमान 20 खोल्या असाव्यात. तेथे डॉक्‍टर, औषधे, रुग्णवाहिका, परिचारिका यांची सोय असणे अनिवार्य आहे. यात सेवेसाठी रुग्णालय चार हजार रुपये आकारतात. तर रुमसाठी सहा हजार रुपये आकारण्यात येतात. याबाबतचा आदेश बुधारी सुमारे 10 हजार बाधित सापडल्यानंतर काढण्यात आला.

दिल्लीतही परिस्थिती फार वेगळी नाही. बुधवारी एका दिवशी 17 हजार 282 नवे बाधित आढळले. तर 104 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली सरकारने हॉटेल ताब्यात घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे करोना बेडस्‌ची संख्या वाढली.

खासगी क्षेत्रातील 23 रुग्णालये हॉटेल आणि बंकेटशी संलग्न आहेत. दिल्ली सरकारची पाच रुग्णालये बंकेट हॉलशी संलग्न आहेत. सेव्हन सी हॉटेल, कॅस्पिआ हॉटेल, प्रान्सर सुट, मयुर विहार, हॉटेल सुर्या, पार्क इन, क्राऊन प्लाझा अशा नामवंत हॉटेल्सचा त्यात समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.