कान्हे येथे कोविड केअर सेंटर सुरू 


वडगाव मावळ –  मावळ तालुक्‍यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्व रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी कान्हे (ता. मावळ) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात करोना समर्पित आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्रात 20 ऑक्‍सिजन बेड व 2 व्हेंटिलेटर आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्‍टर व वैद्यकीय कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. तसेच रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणपत जाधव यांनी दिली.
या वेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के,  डॉ. गुणेश बागडे,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणपत जाधव, डॉ. शशिकांत धंगेकर डॉ. पृथ्वीराज धोंडे, सरपंच विजय सातकर, सदस्य किशोर सातकर,  भाऊ शिंदे, नामदेव शेलार, पौर्णिमा खराते, श्रीलेखा माळवदे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.