“कोविड बॅचच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये”; ‘त्या’ बँकेच्या जाहिरातीवर चौफेर टीका

नवी दिल्ली :  करोनामुळे सर्व क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही सर्वात जास्त तोटा हा विद्यार्थ्यांचे झाले असल्याचे दिसत आहे. दरम्यान, याचा फटका आता विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपासून एचडीएफसी बँकेच्या नोकर भरतीची एक जाहिरात चांगलीच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात कोविड बॅच म्हणजेच 2021 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये अशी अट ठेवण्यात आली होती.

दरम्यान, या जाहिरातीच्या अटीवर चौफेर टीका झाल्यानंतर आता बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या एक वर्षापासून संपूर्ण देशात शाळा कॉलेजेस बंद आहेत. त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आधीच्या गुणांवर आधारित गुण देऊन निकाल जाहीर केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता असताना एचएडीएफसी बँकेची नोकर भरतीची एक जाहिरात व्हायरल झाली.

तमिळनाडूच्या मदुराई शाखेत नोकर भरती होती. त्यात 2021 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांन अर्ज करू नये अशी अट ठेवण्यात आली होती. ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अनेकांनी एचडीएफसी बँकेवर टीकाही केली.

आता बँकेने स्पष्टीकरण देत ही चूक असल्याचे मान्य केले आहे.  तसेच जाहिरात टाईप करताना ही चूक झाल्याचे बँकेने म्हटले आहे. बँकेने स्थानिक वृत्तपत्रांत नवीन जाहिरात दिली आहे. त्यात 2021 मध्ये पास झालेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच बँकेने या चुकीबद्दल खेदही व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.