लसीच्या पेटंटचे हक्क शिथील करण्यास चीनचा पाठिंबा

जिनिव्हा ( COVID-19 vaccine patent waiver ) – कोविड -19 लसांवरील बौद्धिक संपत्ती संरक्षण माफ करण्याबाबत चर्चा करायला चीनने पाठिंबा दर्शवला आहे, असे बीजिंगच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले आहे. जगभर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होण्यासाठी पेटंटचे हक्क शिथील करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली असल्याच्या पार्श्‍वभुमीवर चीनने ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. 

गरीब लोकांच्या ठिकाणी रोगप्रतिबंधक लढा देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या देशांना ही औषधे दिली जावीत, यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने करोनावरील लसींवर पेटंट संरक्षण तात्पुरते काढून टाकण्यासाठी अनेकदा आवहन केले आहे. अमेरिकेने या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला आहे, परंतु काही युरोपियन नेत्यांनी माफीमुळे लसींची सुलभ उपलब्धता सुधारेल की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.

कोविड -19 विरोधी लसीसारख्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधक साथीच्या बौद्धिक संपदा हक्कात सूट देण्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या प्रस्तावाचे चीन समर्थन करत असल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग म्हणाले.

जागतिक पातळीवर लसीची उपलब्धता सुधारण्यासाठी “डब्ल्यूटीओ’ सक्रिय भूमिका बजावू शकेल असा चीनचा विश्वास आहे, असे ते म्हणाले. मात्र त्यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या पुढच्या हालचालींबद्दल तपशीलवार माहिती दिली नाही.

अमेरिकेने कोविड -19 पेटंट संरक्षणावरील माफीच्या योजनेला पाठिंबा दिल्यानंतर आशियातील लस उत्पादक कंपन्यांचे शेअर्स गेल्या आठवड्यात गडगडले. त्यामध्ये शंघाई फोसुन फार्मास्युटिकल आणि कॅनसिनो बायोलॉजिक्‍स या चीनी कंपन्यांच्या शेअरचाही समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.