नवी दिल्ली – देशात डिसेंबर पर्यंत लसीकरण पुर्ण होणार असल्याची माहिती केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सुद्धा निशाना साधला आहे. राहुल गांधी यांनी ज्या प्रकारच्या भाषेचा वापर केला आणि ज्याप्रकारे ते लोकांमध्ये भीती परसविण्याचे काम करत आहेत. यावरुन स्पष्ट होते की टूलकिटच्या मागे कॉंग्रेसचा हात आहे.
Vaccination exercise in India to be complete by December; Health Ministry gave roadmap for producing 216 cr doses by then: Prakash Javadekar
— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2021
प्रकाश जावडेकर म्हणाले की, ”आरोग्य मंत्रालयाकडून डिसेंबर महिन्यापर्यंत 216 करोड लसीचे उत्पादन आणि 108 करोड नागरिकांचे लसीकरण करण्याचा रोडमॅप दिला आहे. राहुल गांधी यांनी लसीकरणासाठी 2024 साल उजाडेल असा दावा केला होता. राहुल यांचा हा दावा जावडेकर यांनी फेटाळून लावला आहे. करोना महामारीच्या प्रतिबंधात्मक कामात व्यस्त असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ‘नौटंकी’ सारख्या शब्दांचा वापर म्हणजे टूलकिलच्या स्क्रिप्टचा एक भाग आहे.”
मागील आठवड्यात आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले होते की, देशात 2021 च्या अखेरीस सर्व वयस्कर नागरिकांचे लसीकरण होणार. करोनाच्या तिसऱ्या लाटेची संभाव्य स्थिती बघता देशात आरोग्य सुविधांमध्ये झपाट्याने सुधारणा केली जात असल्याचा दावा ड़ॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. या लाटेमध्ये लहान बालकांना जास्त धोका होऊ शकतो असेही त्यांनी यावेऴी सांगितले आहे.