पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने १ लाख नागरिकांची कोव्हीड-१९ टेस्ट करण्यात येणार आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली . समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली. यासाठी 1 लाख किट घेण्यास मान्यता देण्यात आली .
पुणे शहरातील वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता जास्तीत जास्त लोकांची कोव्हीड १९ ची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवून पुणे शहर कोरोनामुक्त होण्याच्या दृष्टीने दोन प्रकारच्या टेस्ट करण्यासाठी स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.
फ्ल्यु सदृश्य लक्षणे असलेल्या तसेच अतिजोखमीच्या व्यक्तीच्या संपर्कातील आलेल्या व इतर ह्दय विकार, फुप्फुस, यकृत मुत्रपिंड विकार,मधुमेह तसेच रक्तदाब इ. विकार असलेल्या त्याचप्रमाणे केमो थेरपी, एचआयव्ही पॉजिटिव, अवयव प्रत्यारोपण केलेले किंवा वयोष्ट व्यक्तीवर तसेच गरोदर महिलांवर तातडीने उपचारासाठी रुग्णलयामध्ये ही तातडीची चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिकीट 450 रु. प्रमाणे 4 कोटी 50 लाख रुपयांच्या खरेदीस मान्यता देण्यात आली असल्याचे रासने यांनी स्पष्ट केले.