नवी दिल्ली – देशात प्राणघातक करोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 10 हजार 488 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 313 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 714 झाली आहे.
#COVID-19 | India reports 10,488 new cases, 12,329 recoveries & 313 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry.
Total cases 3,45,10,413
Total recoveries 3,39,22,037
Death toll 4,65,662
Active cases 1,22,714Total Vaccination: 1,16,50,55,210 pic.twitter.com/CImIcmfqTf
— ANI (@ANI) November 21, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 12 हजार 329 लोक करोनातून बरे झाले आहेत. त्याचबरोबर करोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 65 हजार 662 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 3 कोटी 45 लाख 10 हजार 413 रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 3 कोटी 39 लाख 22 हजार 37 लोक करोनामुक्त झाले आहेत.