कोविड-19 मुळे रुग्णांच्या हृदययावरील ताण वाढला

जागरूकता असूनही महामारीच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांच्या वार्षिक तपासणीचे करोनापूर्वी असलेले 92 टक्‍के प्रमाण करोनाच्या काळात 77 टक्‍क्‍यांवर घसरले आहे. महामारीमुळे लागलेले लॉकडाऊन हळूहळू हटविण्यात येऊ लागल्यानंतर तपासणीचे प्रमाण 83 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. हृदयविकाराचे निदान झालेल्या व्यक्‍तींपैकी 56 टक्‍के व्यक्‍तींना स्वतः कोविडचा संसर्ग झाला तर 25 टक्‍के व्यक्‍तींना त्यांच्यासोबत राहात असलेल्या कुटुंबीयांच्या माध्यमातून संसर्ग झाला.

हृदयविकारग्रस्त सर्व व्यक्‍तींचा विचार करता महिलांना (69%) पुरुषांच्या (43%) तुलनेत अधिक प्रमाणात संसर्ग झाल्याचे आढळले. हृदयविकाराचा त्रास असलेल्या चाळीशीपेक्षा अधिक वयाच्या व्यक्‍तींमध्ये (64%) कोविडचा संसर्ग 41 वयापेक्षा कमी वय असलेल्यांच्या (53%) तुलनेत अधिक प्रमाणात दिसून आला.

सुदृढ व्यक्‍तींनाही केवळ मानसिक तणावच नव्हे तर हृदयविकाराच्या अथवा झटक्‍याच्या भीतीने ग्रासले होते. त्यातील तीनचतुर्थांश व्यक्‍तींमध्ये कोविडमुळे ही जोखीम वाढल्याची भावना होती. ही भावना बाधित कुटुंबाचा भाग असलेल्या व्यक्‍तींच्या (76%) तुलनेत स्वत:ला कोविडचा संसर्ग झालेल्या व्यक्‍तींमध्ये (83%) अधिक होती.

एकतृतीयांश व्यक्‍तींमध्ये कोविडपश्‍चात ताण वाढल्याचे दिसून आले तर त्यांपैकी 51 टक्‍के जणांना कोविडचा संसर्ग झाला तर 38 टक्‍के व्यक्‍तींमध्ये ते राहात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. कोविड संसर्गाच्या पश्‍चात दोनतृतीयांश व्यक्‍तींना हृदयविकाराशी संबंधित त्रास झाला. ही समस्या टियर वन आणि टू शहरांच्या (सुमारे 67 %) तुलनेत महानगरात (55 %) कमी प्रमाणात आढळून आली आहे.

बदलत्या जीवनशैलीच्या माध्यमातून आशेचा नवा किरण एकतृतीयांशपेक्षा अधिक व्यक्‍तींनी हदयाचे सक्षम आरोग्य लाभण्यासाठी जीवनशैली, आहार आणि पर्यावरणात बदल आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे. तरुण वयोगटाच्या तुलनेत बदल करण्याची अधिक जाणीव असल्याने हा बदल 41 ते 50 वर्षे या वरिष्ठ वयोगटात अधिक प्रमाणात दिसून आला आहे. तसेच कोविड-19 मुळे हृदयविकार अथवा झटक्‍याचा धोक्‍याची अधिक जोखीम असल्याची धारणा असलेल्या व्यक्‍तींमध्ये (दोन पंचमांशपेक्षा अधिक) जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याची प्रवृत्ती हीच जाणीव नसलेल्या व्यक्‍तींच्या (24%) तुलनेत अधिक प्रमाणात आढळली. यात महिलांनी अधिक आघाडी घेतली आहे. 32% पुरुषांच्या तुलनेत 45% महिला चांगले आरोग्य लाभण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीत आवश्‍यक ते बदल घडवून आणत आहेत.

या सर्वेक्षणाने असे दाखवून दिले की लोकांना निरोगी दिनचर्येचे पालन करण्यासाठी सर्वोच्च प्रेरणा देणारे घटक म्हणजे उत्तम मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता हे आहेत. एखाद्या व्यक्‍तीच्या कुटुंबाचे आरोग्य हे मानसिक आरोग्य राखण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावते. कारण सीव्हीडीच्या विकाराने त्रस्त असलेल्या कुटुंबातील व्यक्‍ती (62 %) स्वतः सीव्हीडीने त्रस्त असलेल्या व्यक्‍तींच्या (50 %) तुलनेत स्वतःचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अधिक प्रेरित असल्याचे दिसून आले आहे. स्वतःचे आणि त्यांच्या प्रियजनांचे संपूर्ण कल्याण राखण्यासाठी आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती जनमानसातील या आमूलाग्र बदलामुळे वाढली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.