न्यूयॉर्क – अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीसने कोरोनाची स्वदेशी लस कोव्हॅक्सिन संदर्भात एक चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या अभ्यासात असा दावा केला गेला आहे की, भारतात आढळून आलेल्या डबल म्युटंट कोरोना व्हॅरिएंटविरुद्ध कोव्हॅक्सिन बऱ्याच प्रमाणात संरक्षण प्रदान करते.
हे व्हॅक्सिन ब्रिटनमध्ये आढळणार्या व्हेरिएंट्ससह इतर अनेक व्हेरिएंटवर प्रभावी आहे. यापूर्वी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) देखील जवळजवळ सर्व प्रमुख व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन प्रभावी असल्याचे सांगितले होते.
कोरोना व्हॅक्सीन बनवणारी हैदराबादची कंपनी भारत बायोटेक आणि ICMR ने कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम क्लीनिकल ट्रायल रिपोर्टमध्ये म्हटले होते की, कोव्हॅक्सिन क्लिनिकल 78% आणि कोरोनाने गंभीरित्या प्रभावित झालेल्या रुग्णांवर 100% पर्यंत प्रभावी आहे.
कंपनीने आपल्या एनालिसिसमध्ये कोरोनाचे 87 लक्षणांवर रिसर्च केला होता.