मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे. अजित पवार यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली होती, ही मालमत्ता आता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजित पवार यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली होती, ही मालमत्ता आता मुक्त करण्यात आली आहे यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. ते मला माहिती नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
EVM बाबत काय म्हणल्या सुप्रिया सुळे?
यावेळी ईव्हीएमबाबत सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्हणाल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. जर एकदा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या तर काय अडचण आहे. शरद पवार आणि जयंत पाटील हे मारकडवाडीला जाणार आहेत. एखाद्या गावात एखादी ॲक्टिव्हिटी होत असेल तर सरकारला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे, तसेच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे असेदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.