देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा दिलासा; जामीन मंजूर

नागपूर – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मतदान प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी फडणवीस यांना न्यायालायने जामीन मंजूर केला आहे. देवेंद्र फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते.

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. फडणवीस यांनी सत्र न्यायालयात मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मागाच्या दरवाजाने प्रवेश केला असे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे.

फडणवीस यांनी 2014 मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यावर दाखल असणाऱ्या दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. हे गुन्हे 1996 आणि 2003 मधील आहेत. हे गुन्हे दडवणे हा लोकप्रतिनिधी कायच्याच्या कलम 125 अ चे उल्लंघन आहे. या कलमानुसार लोकप्रतिनिधीने आपल्या अर्जात चुकीची माहिती दिली असेल अथवा दाखल गुन्ह्यांची माहिती दडवली असेल तर सहा महिने कारावासाची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही होऊ शकते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.