नांदेड : सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी 40 लाखांची लाच मागितल्याच्या प्रकरणात, मुख्याध्यापकाचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेड येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.
दिव्यांग शाळेतील 4 कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा सव्वा कोटींचा फरक प्रलंबित होता. तो काढण्यासाठी खानापूर (ता.देगलूर) येथील वैभव निवासी शाळेचा मुख्याध्यापक यादव सूर्यवंशी याने इतर दोघांसह 40 टक्केच्या हिशेबाने 40 लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बँकेत जमा झाल्याबरोबर लाचेचे 40 लाख रुपये द्यावे लागतील असे ठरले होते. त्यानुसार 22 नोव्हेंबरला दुपारी बँकेतून 40 लाखांची रक्कम काढून तक्रारदाराने लिपिक शिवराज बामणे आणि लिपिक चंपत वाडेकर या दोघांना दिली होती.