कोलकाता – पश्चिम बंगाल मधील भवानीपुर मतदार संघातील विधानसभेची पोटनिवडणूक रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका आज कोलकत्ता हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
या पोटनिवडणुकासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उमेदवार आहेत. त्या सध्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या सदस्या नाहीत. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या सुवेंदु आधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. त्यांना आता मुख्यमंत्रीपद टिकावयचे असेल तर सहा महिन्याच्या आत कोणत्या तरी मतदार संघातून निवडून येणे आवश्यक असल्याने या निवडणुकीला महत्व आहे.
पण विविध मुद्दे पुढे करून हीं निवडणुकच रद्द करण्याचा प्रयत्न काही घटकांनी चालवला आहे. राज्याचे मुख्यसचिव राजेश बिंदाल यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून भवानीपुरची पोटनिवडणुक पुढे ढकलल्यास राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो असे म्हटले होते. या पत्रात मुख्य सचिवांनी योग्य भाषा वापरलेली नाही असा आक्षेपही हायकोर्टाने घेतला आहे.