दारूगोळा कारखान्याचे कर्मचारी आजपासून संपावर

पुणे – केंद्र सरकारकडून देशभरातील आयुध निर्माण कारखान्यांचे (ऑर्डनन्स फॅक्‍टरी) निगमीकरण (कॉर्पोरेशन) केले जात असल्याचे सांगत, याच्या निषेधार्थ देशभरातील ऑर्डनन्स फॅक्‍टरीतील कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या संयुक्त संघर्ष समितीने आजपासून महिनाभरासाठी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे देशभरातून 82 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यात पुण्यातील खडकी येथील ऑर्डनन्स फॅक्‍टरीतील 7 हजार कर्मचाऱ्यांचाही सहभागी झाले आहेत.

आयुध निर्माणी कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन थांबावे, यासाठी राष्ट्रीय महासंघ, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (बीपीएमएस), ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन (एआयडीईएफ), इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन (आयएनडीडब्लूएफ), सीडीआरए या संघटना एकत्रित आल्या आहेत. या संघटनांची मिळून संयुक्‍त संघर्ष समिती तयार करण्यात आली आहे. समितीने 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरपर्यंत एक महिनाभराचा देशव्यापी संप पुकारला आहे. देशभरातील 41 ऑर्डनन्स फॅक्‍टरीमधील कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशात युद्धसामग्री तयार करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्‍टरींना ब्रिटिशकाळापासूनचा इतिहास आहे. मात्र, उद्योगपतींना डोळ्यांसमोर ठेवून ऑर्डनन्स फॅक्‍टरीचे निगमीकरण (कॉर्पोरेशन) करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. असे करणे, म्हणजे देशातील अमूल्य संपत्तीचे निगमीकरण करण्यासारखे आहे, असा आरोपही या संघटनांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)