PM Narendra Modi | देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेला टाटा समूह हवाई दलासाठी विमाने बनवणार आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज टाटा एअरक्रॉप्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करणार आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनणार आहे.
भारत आणि स्पेन दरम्यान ५६ विमाने बनवण्याचा करार झाला आहे. त्यातील १६ विमाने स्पेनमध्ये तयार होणार आहे. त्यानंतर ४० विमाने टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड गुजरातमधील वडोदरा येथे बनवणार आहे. टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड विमान बनवणारी देशातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे. PM Narendra Modi |
ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची गरज भारतीय हवाईदलास होती. त्या माध्यमातून सैनिक, शस्त्रास्त्रे, इंधन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेता येणार आहे. कमी वजनाच्या सामग्रची वाहतूक करणार आहे. सी-२९५ विमान दोन व्यक्ती उडवू शकतात. त्यात ७३ सैनिक किंवा ४८ पॅराट्रूपर्स बसू शकतात. तसेच १२ स्ट्रेचर इंटेसिव्ह केयर मेडवॅक किंवा २७ स्ट्रेचर मेडवॅकसोबत ४ मेडिकल अटेंडेंट प्रवास करु शकतात. हे एअरक्रॉप्ट जास्तीत जास्त ९२५० किलो वजन घेऊन जाऊ शकते. PM Narendra Modi |
त्याची लांबी ८०.३ फूट, विंगस्पॅन ८४.८ फूट आणि उंची २८.५ फूट आहे. या एअरक्राफ्टमध्ये ७६५० लिटर इंधन येते. ४८२ किलो मिटर प्रतितास वेगाने ते उडू शकते. त्याची रेंज १२७७ ते ४५८७ किमी आहे. त्यात किती वजन आहे, त्यावर रेंज ठरणार आहे. जास्तीत जास्त १३,५३३ फूट उंच ते जाऊ शकते.
लहान रनवे वरुन उड्डाण
ही विमाने ८४४ मीटर ते ९३४ मीटर लांबीच्या रनवेवरुन उड्डाण घेऊ शकतात. त्याला उतरण्यासाठी फक्त 420 मीटरचा रनवे लागतो. त्यात सहा हार्ड पॉइंट्स आहेत. म्हणजेच शस्त्रे आणि संरक्षण यंत्रणा बसवण्याची जागा आहे. दोन्ही पंखाखाली प्रत्येकी तीन किंवा इनबोर्ड पाइलॉन्स असू शकतात. ज्यामध्ये 800 किलो वजनाची शस्त्रे बसवता येतील. PM Narendra Modi |
टाटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून 40 विमानांसाठी मेटल कटिंगचे काम सुरू केले आहे. हैदराबाद येथे सध्या त्याचे मुख्य काम सुरु आहे. अनेक भाग या ठिकाणी साठवले जात आहेत. टाटाचे हैदराबाद केंद्र विमानाचे प्रमुख भाग तयार करेल. त्यानंतर त्याला वडोदरा येथे पाठवले जाईल.
हेही वाचा:
“मर्द होतात तर पळून का गेलात?”; बाळासाहेब थोरातांचा सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा