शारदा सहकारी दूध उत्पादक संस्थेला मान
प्रायोगिक तत्त्वावर 100 टक्के अनुदान मंजूर
भवानीनगर (वार्ताहर) – बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला एन. डी. डी. बी. च्या नॅशनल डेअरी प्लॅन -1 अंतर्गत देशातील पहिला मुरघास पायलट प्रोजक्ट प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर दूध संस्थेसाठी 100 टक्के अनुदानात मंजूर झाला आहे. हा प्रोजक्ट संघामार्फत काटेवाडी (ता. बारामती) येथील शारदा सहकारी दूध उत्पादक संस्थेला देण्यात आला आहे.
संघाचे अध्यक्ष संदिप जगताप म्हणाले की, एन. डी. डी. बी.ने देशातील पहिला व्यवसायिक मुरघास पायलट प्रोजक्ट आपल्या संघास दिला असून प्रोजक्ट बजेट 18.50 लाख रुपये आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर तो देशभर राबविणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांकरीता चांगल्या प्रतीचा चारा योग्य मोबदल्यात मिळणार असून ज्या दूध उत्पादकांना जमीन नसेल अशा मजुरांना पशुधनाचे चांगले संगोपन करता येणार आहे. चांगल्या गुणवत्तेचा मुरघास उपलब्ध झाल्यामुळे दूध उत्पादनात वाढ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रोजक्टचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 13) संघाचे अध्यक्ष संदिप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व काटेवाडीचे सरपंच विद्याधर
काटे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र रायकर, शारदा सहकारी दूध संस्थाचे अध्यक्ष महादेव कचरे, ज्येष्ठ संचालक प्रकाश तावरे, आप्पासाहेब शेळके, तानाजी खोमणे, संघाचे वित्त व लिखा विभागाचे उपमहाव्यवस्थापक राजेंद्र शिर्के, पशुखाद्य विभागाचे व्यवस्थापक कैलास भुजबळ, डेअरी व्यवस्थापक संदिप भापकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. काळे, डॉ. सूर्यवंशी, डॉ. मोरे विठ्ठल काळे, संजय देवकाते, प्रकाश काटे, संघाचे माजी ज्येष्ठ संचालक एकनाथ काटे, शारदा पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल घुले, काटेवाडी सोसायटीचे अध्यक्ष संजय शेळके, अनिल काटे, शितल काटे, जंगल वाघ, दत्तत्रय पानसरे, हनुमंत कुदळे, हनुमंत माने, दत्तात्रय काटे, वैरण विकास अधिकारी प्रतिक जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.