देशातला पहिला करोना रुग्ण पुन्हा ‘पॉझिटीव्ह’

थिरूवनंतपूरम – देशातला पहिला करोना रुग्ण केरळात आढळून आला होता. हाच रुग्ण आज पुन्हा करोना पॉझिटीव्ह झाल्याचे वृत्त आहे. थ्रिुसुर येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही एक महिला रुग्ण असून आज पुन्हा तिचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

दिल्लीला शिक्षणासाठी जाण्यासाठी म्हणून या महिलेने आपली आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात ही बाब निष्पन्न झाली आहे.

सदर महिला सध्या तिच्या घरातच क्वारंटाईन असून ती बऱ्यापैकी तंदुरुस्त आहे असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर महिला चीनमधील वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. जानेवारी 2020 मध्ये ती तिची सेमिस्टर परीक्षा संपल्याने सुट्टीसाठी म्हणून केरळात आपल्या घरी परतली होती. त्यानंतर काही दिवसांनी तीला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

ती भारतातील पहिली करोना रूग्ण ठरली होती. तिला फेब्रुवारी 2020 मध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.