लॉकडाऊनपासून अद्यापही काहीजण घरून काम करत आहेत. यामुळे काही गोष्टींमध्ये फायदा देखील होत आहे. अनेकदा आपण घरून काम करताना नाईट ड्रेसवर किंवा शॉर्ट कपड्यांमध्ये काम करू शकतो. यामध्ये सामान्य माणसांबरोबरच बॉलीवूड सेलिब्रिटीदेखील आघाडीवर आहेत. नुकताच प्रियांका चोप्रा जोनासने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
यामध्ये तिने फ्लिप फ्लॉप्स घातल्या आहेत. प्रियांका आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झूम ऍपवर व्हर्च्युअल मिटिंग घेतली. या व्हिडिओत ती फॉर्मल शर्ट आणि पॅंटमध्ये दिसते. पण त्यावर डिझायनर बुट न घालता तिने फ्लिप फ्लॉप घातले आहेत.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये तिने असे म्हटले आहे. दरम्यान, प्रियांका सध्या “व्हाईट टायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात प्रियांका ही पिंकी मॅडमची भूमिका साकारत आहे. तसेच निर्माती म्हणून देखील या चित्रपटामधे तिचा सहभाग आहे. नुकतेच तिने लंडनमध्ये “टेक्स्ट फॉर यू’चे शूटिंग पूर्ण केले असून रुसो ब्रदर्सच्या “सिटाडेल’ आणि “द मॅट्रिक्स 4’मध्ये देखील झळकणार आहे. “टेक्स्ट फॉर यू’मध्ये तिच्याबरोबर मिंडी कलिंग आणि डॅन गुर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.