आजही गुलामीच्या जोखडात असलेले देश

प्रतीकात्मक चित्र

वॉशिंग्टन – सर्वसाधारणपणे प्रतीवर्षी 10 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांमार्फत मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जगभर विविध मानवी हक्कांच्या तरतुदींविषयी जनजागृती केली जाते. साधारणपणे विसाव्या शतकाच्या मध्यात या पृथ्वीवर अनेक देश अन्य कोणत्यातरी देशाच्या अधिपत्याखाली होते. फ्रेंच, पोर्तुगीज, चीनी आणि ब्रिटीशांनी जगभर विविध वसाहती आणि देशांवर राज्य केले होते. अशा देशांत मानवी हक्कांची पायमल्ली सहजपणे केली जात असे. त्यामधले अनेक देश नंतर स्वतंत्र झाले, काही नव्या देशांची निर्मितीही झाली. मात्र आज एकविसावे शतक सुरु होऊन दोन दशके झाली, तरीही काही देश गुलामगिरीच्या विळख्यात आहेत.

स्पेनमधील कॅटॅलॉनिया प्रांतात वर्ष 2014 मध्ये इथे एक मतमोजणी झाली होती आणि त्यावरून हे समजले की इथल्या 80% लोकांना स्वातंत्र्य हवे आहे. कुर्डीस्तान हा भाग सीरिया, इराण, इराक, टर्की या देशांचा सामायिक भाग असून येथील नागरिकही गेली अनेक वर्षे स्वतंत्र कुर्डीस्तानसाठी लढा देत आहेत. सध्या ह्या इलाख्यात टर्की देशाने आक्रमण केलेले आहे आणि अमेरिकी सेना येथून माघार घेत आहे. इथेसुद्धा काही वर्षांपूर्वी जनमत चाचणी घेतली असता, 92% लोकांनी वर्ष 2017 मध्ये स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला होता.

साधारण अशीच स्थिती सर्ब गणराज्यातील बॉस्निया आणि हरझेगोविना भागाची आहे. स्कॉटलंड, उत्तरी आयर्लंड, वेल्स या भागांवर आजही ब्रिटीशांचे वर्चस्व असून, ब्रिटीशांच्या स्वातंत्र्यावरील सूर्य मावळला असला तरी येथे अजूनही ब्रिटनची सत्ता प्रस्थापित आहे. या सर्वांना आपण इंग्लंड किंवा युनायतेड किंग्डम म्हणत असलो तरी हे ब्रिटनचे वेगवेगळे भाग आहेत आणि हे वेगळे देशाचं आहेत. इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड आणि वेल्स एकत्र ब्रिटन किंवा यू के बनतात. त्यात ही दक्षिणी आयर्लंडला स्वातंत्र्य मिळालेले आहे. वर्ष 2014 मध्ये 45% लोकांनी जनमत चाचणीमध्ये आपल्याला युकेचा भाग म्हणून राहण्याच्या बाजूने कौल दिला होता. त्यानंतर जेव्हा ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची घोषणा केली, त्यावेळी स्कॉटलंड आणि उत्तरी आयर्लंडने त्याला विरोध दर्शवला. त्यामुळे आता एक नवीन देश तयार होण्याची शक्‍यता आहे.

याशिवाय सोमालियातून सोमालीलॅंड, रशियातून कलिनिंग्रॅड, मोरोक्कोच्या अधिपत्याखालील पश्‍चिम साहारा, पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांत तसेच पाकिस्तान-अफगाणिस्तानमधून वझिरीस्तान वेगळे होण्याच्या तयारीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)