मतमोजणीची तयारी पूर्ण

नगर  – मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणुकी साठीची मतमोजणी प्रक्रिया ही त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्याची सर्व तयारीही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे.

त्याठिकाणी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे. विशेषता तेथील सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असणार आहे. तेथील मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही, व्हीडिओग्राफीची सुविधा, मतमोजणी केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती, मतमोजणी केंद्राच्या परिसरातील चोख सुरक्षा व्यवस्था अशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी 3722 मतदानकेंद्रे आहेत.

कशी होणार मतमोजणी
एका मतदारसंघात मतमोजणीचे 14 टेबल असणार आहेत.एका टेबलवर एक पर्यवेक्षक,1 सहाय्यक कर्मचारी,1 सुक्ष्म निरीक्षक असणार आहेत.तसेच एक व्हीपॅट टेबल,एक पोस्टल मतांसाठी टेबल,एक सैनिकी मतांसाठी टेबल,तर एक संगणीकरण हाताळणीकरण,हस्तलिखीत कागदपत्र यासाठी असणार आहे. 14 मतदान केंद्राची मिळून एक फे री होईल. या फे ऱ्या त्या-त्या मतदारसंघातील मतदान केंद्रातील संख्येवर अवंलबून आहे.

मतमोजणीला सकाळी 8 वाजता प्रारंभ होईल.सुरुवातीला पोस्टल व सैनिक मतदान मोजले जाईल. त्यांनतर ईव्हीएम मशिनच्या मतांची मोजणी सुरु होईल.ती सुरु होण्यास कीमान दहा वाजू शकतात. त्यामुळे पहिला कल दहा नंतरच हाती येण्याची शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील पाच व्हीपॅट यंत्रांची म्हणजेच चिठ्ठ्यांची सोडतीव्दारे मोजणी होईल. मतमोजणीसाठी कीती असणार कर्मचारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 48 पर्यवेक्षक,85 सहाय्यक कर्मचारी,20 सुक्ष्म निरीक्षक,57 शिपाई कर्मचारी अशी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या असणार आहे. मतदारसंघनिहाय ही संख्या कमी अधिक होवू शकते.

कोणत्या मतदारसंघाची मतमोजणी कोठे होणार
अकोले मतदारसंघाची मतमोजणी कोल्हार-घोटी रोडवरील पॉलीटेक्‍निक कॉलेज, अकोले. संगमनेर मतदारसंघाची मतमोजणी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स,संगमनेर. शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी राहाता येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोपरगाव येथील मतमोजणी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कोपरगाव. श्रीरामपूर मतदारसंघाची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, श्रीरामपूर. नेवासा मतदारसंघाची मतमोजणी नवीन शासकीय गोडावून सेंट मेरी स्कूल जवळ, मुकींदपूर येथे होणार आहे. शेवगाव मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय शेवगाव.

राहुरी मतदारसंघाची मतमोजणी लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्टस, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, राहुरी. पारनेर मतदारसंघाची मतमोजणी न्यू आर्टस कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पारनेर. अहमदनगर शहर मतदारसंघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. 4, एमआयडीसी नागापूर येथे होणार आहे.श्रीगोंदा मतदारसंघाची मतमोजणी ही पेडगाव रोडवरील शासकीय गोदाम, श्रीगोंदा येथे तर कर्जत-जामखेड मतदारसंघाची मतमोजणी नवीन तहसील कार्यालय, कर्जत येथील शासकीय गोडावून येथे होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.