पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी थांबवली

पुणे : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पहिल्या फेरीनंतर थांबवण्यात आली आहे. काही इव्हीएम मशीन सील नसल्याने कॉंग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे इथली मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. त्यातच पुण्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता इथल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी थांबवण्यात आली आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी मतमोजणीच्या ठिकाणी पोहचले आहेत. दरम्यान, पहिल्या फेरी अखेर सुनील कांबळे 300 मतांनी आघडीवर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.