Baramati and Rahuri by-election results : बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या दोन्ही ठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर जिल्हा प्रशासनाकडून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी ८ वाजता बारामती आणि राहुरीत पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली असून, आता पहिल्या फेरीचे कल हाती येत आहेत. टपाली मतमोजणीत सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत. तसेच राहुरीमध्येही टपाली मतमोजणीत अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे. त्यानंतर मुख्य मतमोजणीला सुरुवात होईल. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीच अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी अक्षय कर्डिलेंचे बॅनर लावले आहेत. मित्रा आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा बॅनर वर मजकूर आहे.