पुणे – भारतीय चलनातील 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याप्रकरणात मुख्य आरोपी लष्करी लान्स नाईकसह अटक केलेल्या सहा जणांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली.
शेख अलिम समद गुलाब खान (वय 36, रा. जेडीसी पार्क, प्रतिकनगर, येरवडा) असे या लान्स नाईकचे नाव असून तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप खडकी या ठिकाणी कार्यरत आहे. त्याच्यासह
सुनिल बद्रीनारायण सारडा (वय 40), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय 43), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय 18), रितेश रत्नाकर (वय 34) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय.28) या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. पुष्कर दुर्गे, ऍड. हेमंत झंजाड आणि अॅड. भूपेंद्र गोसावी यांनी काम पाहिले.
विमाननगर भागातील एका बंगल्यात बनावट नोटांचा साठा मोठ्या प्रमाणावर करून ठेवल्याची माहिती लष्करी गुप्तचर यंत्रणेला (एमआय) मिळाली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी सर्वांना न्यायालयात हजर केले होते.