पुणे(प्रतिनिधी) – बनावट नोटा बाळगल्या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्याला सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.
नयुम रहिमसाहेब पठाण (वय 33, रा. औंध) असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचे नाव एफआयआरमध्ये नाही. त्याने नोटा बनविलेल्या नाहीत. त्या नोटा बनावट असल्याचे त्याला माहित नव्हते. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी अॅड. पुष्कर दुर्गे यांनी केली होती.
पिंपरी पोलिसांना मुबई-पुणे रस्त्यावर आकुर्डी येथे नाकाबंदी दरम्यान स्विफ्ट कारमध्ये 2 हजार रुपयांच्या 149 बनावट नोटा आढळून आल्या होत्या. 16 ऑगस्ट 20202 रोजी ही कारवाई केली होती. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पठाण याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला होता. तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे आणि पोलीस बोलावतील त्यावेळी तपासास हजर राहण्याच्या अटीवर न्यायालयाने मंजुर केला.