उपग्रह प्रक्षेपणासाठी इराणकडून “काऊंट डाऊन’सुरू

तेहरान : वैज्ञानिक निरीक्षणासाठी अवकाशात सोडायच्या उपग्रहासाठीचे “काउंट डाऊन’ इराणने सुरू केले आहे. इराणचे दूरसंचार मंत्र्यांनी ही माहिती दिली. इराणच्या अंतराळ कार्यक्रमाबाबत अमेरिकेने यापूर्वीच चिंता व्यक्‍त केली आहे. इराणए 2019 च्या जानेवारी महिन्यात अंतराळात सोडलेले रॉकेट हे चिथावणीखोरपणाचे असल्याची टीका अमेरिकेने केली होती. त्या पार्श्‍वभुमीवर इराणने या वैज्ञानिक उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजित केले आहे.
“झफर सॅटेलाईटचे काउंट डाऊन सुरू करत आहोत’ असे दूरसंचार मंत्री मोहम्मद जावद अझरी जाहरोमी यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे.
113 किलो वजनाच्या झफर या उपग्रहाचे प्रक्षेपण म्हणजे फारसीचा विजय असेल, असे 1 फेब्रुवारीच्या ट्‌विटमध्ये इराणच्या अंतराळ संस्थेने म्हटले होते. हा उपग्रह पृथ्वीपासून 530 किलोमीटर (329 मैल) उंचावर सिमोरगढ रॉकेटच्या माध्यमातून प्रस्थापित केले जाणार आहे. या उपग्रहाचे मुख्य काम अवकाशातून छायाचित्रे घेणे हे असणार आहे. भूकंप, नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास आणि शेतीचा विकास करण्यासाठी या छायाचित्रांचा उपयोग इराणला होणर आहे. यापूर्वी जानेवारी 2019 मध्ये पायम या क्षेपणास्त्राला आपली अपेक्षित उंची गाठता आलेली नव्हती. मात्र याने आपला अपेक्षित पर्यावरणाचा डाटा गोळा केला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले होते. इराणने उपग्रह अंतराळात सोडण्याने 2015 च्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा भंग होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. 2231 या ठरावामध्ये इराणने कोणत्याही प्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा उपयोग आण्विक शस्त्रनिर्मितीसाठी करू नये, असे म्हटले आहे.
आण्विक शस्त्रे घेण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे इराणने म्हटले आहे. आपले अंतराळ संशोधन शांततेत सुरू असून सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन होत नाही असे इराणचे म्हणणे आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.