बारामती (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि मानसशास्त्र विभाग यांच्या मार्फत ऑनलाईन आणि टेलिफोन द्वारे समुपदेशन (काउन्सेलिंग) आणि मानसिक आरोग्य सेवा नागरिकांसाठी सुरू केली आहे .
कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यांना चिंता, अनिश्चितता, निराशा, भिती, सामाजिक विलगीकरण आणि असुरक्षितपणाचा इत्यादी समस्यांचा सामना करणे कठीण जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील लोकांच्या मानसिक आरोग्यावर आणि उच्च धोक्यामध्ये वावरणाऱ्या लोकसंख्येवर कोरोनाचा प्रभाव नोंदवून त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या पुढाकारातुन काेव्हिड -१९ च्या उद्रेकाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी मानसशास्त्र विभागाने ऑनलाइन मानसिक आरोग्य सहाय्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. ही समुपदेशन सेवा ऑनलाईन तसेच टेलिफोन स्वरूपात दिली जाणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी याबाबत माहिती दीली आहे़. या बाबत मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार शिंदे व विभागातील त्यांचे सहकारी यांनी ही ऑनलाईन समुपदेशनाची सेवा देण्याचे ठरवले आहे विभागातील सर्व प्राध्यापक या समुपदेशन कार्यक्रमा मध्ये भाग घेणार असून, डब्ल्यूएचओ, आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे महाविद्यालयाने हा समुपदेशन सेवेचा उपक्रम घेण्याचे ठरवले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्याना किंवा समाजामधील व्यक्तींना खालील प्रकारच्या समस्यां जाणवत असतील तर त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा किंवा व्हाट्सअॅपला मेसेज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आपणास तणाव, भिती किंवा चिंता वाटते का? परिस्थितीशी जुळवुन घेणे कठीण जाते आहे का?
आत्महत्येचे विचार मनात येत आहेत का?
समाजिक विलगीकरणामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते का?
वेळेचे नियोजन करणे कठीण जाते आहे का?
तुम्ही खुप विचार करत आहात का?
झोप लागणे कठीण होते आहे का?
रोजची कामे करणे कठीण जाते आहे का?
लहान मुलांना सांभाळताना चिडचिड होती आहे का?
जेष्ठ नागरिकांना अशा परिस्थितीचा सामना करणे कठीण वाटते का?
वरील अनेक प्रश्ननांची उत्तरे होय असतील तर तुम्ही समुपदेशकांची मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे
संपर्कासाठी
डॉ.विजयकुमार शिंदे 7588945168 (वेळ=सकाळी10 ते12)प्रा.ज्योतीराम आवटे981318007(वेळ =दुपारी 12 ते2)प्रा.लोंढे दत्ता7709695134(वेळ =दुपारी 2 ते 4)प्रा.खोमणे दत्तात्रय9850791210(वेळ =सायंकाळी 4ते6)
डॉ.ढमे गणेश 9604068959(वेळ =सांयकाळी 6