चांगली बहीण होऊ शकले नाही!

हे विधान ऐकून उत्सुकता वाढली असेल ना? कुणी केलंय हे विधान, काय झालंय असे अनेक प्रश्‍न मनात दाटून आले असतील ना? वाचकहो, हे वक्‍तव्य केलंय बॉलीवूडची आघाडीची नायिका आलिया भट हिने. आता तुम्हाला वाटेल की आलियाने हे विधान पूजा भटबाबत केले असेल; पण थांबा तसे नाहीये; हे वक्‍तव्य आहे शाहीनबाबत. शाहीन बऱ्याच काळापासून नैराश्‍याचा सामना करत होती.

आलिया सांगते की तिला आपल्या बहिणीने लिहिलेल्या आय हॅव नेव्हर बीन (अन) हॅप्पियर या पुस्तकातन तिच्या मानसिक स्थितीविषयी समजले. मानसिक आरोग्य या विषयावर आधारित एका कार्यक्रमामध्ये आपली बहिण शाहीनसोबत आलेली आलिया याविषयी बोलताना अक्षरशः रडली. रडवेल्या आवाजात आलियाने सांगितले की, मला अचानक खूप अस्वस्थ वाटतंय.

मी इतकी अस्वस्थ आहे की जेव्हा मी बहिणीविषयी बोलायला सुरुवात करेन मी कोणत्याही क्षणी रडू लागेन. नैराश्‍य ही गोष्ट अशी आहे की आपण स्वतः त्या मानसिकतेतून गेल्याखेरीज आपल्याला त्याची कल्पना येत नाही. माझी आजची प्रतिक्रिया तशीच आहे. मी आजही शाहीनच्या वेदना समजू शकलेले नाही. आज 20 वर्षे उलटून गेली आहेत. पण जेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हा मी मनातून उद्‌ध्वस्त झाले होते आणि मलाही जीवन संपवावेसे वाटू लागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.