बारामती- काॅटनकिंग कंपनीच्या वतीने बारामती तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा वर्कर्स यांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५०० मास्कचे वाटप केले.
यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर श्री.आर.बी.गायकवाड यांच्या हस्ते बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांच्याकडे कोरोना मदत कक्ष, राष्ट्रवादी भवन, कसबा, बारामती येथे देण्यात आले. यावेळी बारामती तालुका NCP चे अध्यक्ष श्री. संभाजी होळकर व बारामती नगरपरिषदेचे गटनेते श्री.सचिन सातव उपस्थित होते.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस दुपटीने वाढत आहे. त्यामुऴे अनेक जिल्ह्यात अनेक स्तरावर कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेे.