धुळे : कापसाच्या ट्रकला आग लागून किन्नरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कर्नाटकहून गुजरातकडे जाणारा ट्रक पंचर झाला होता. चालकाने ट्रक रस्त्यावरच्या कडेला लावलत असताना वीज कंपनीच्या हाय टेशनच्या तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने कापसाला मोठी आग लागली.
या आगीत ट्रकमध्ये असलेल्या किन्नरचा होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाचे दोन बंब तात्काळ दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.