कोट्टीगोडा बनला पॉल ऍडम्सचा अवतार

नवी दिल्ली: अबूधाबी येथे सुरू असलेल्या टी-10 लीगमध्ये बांग्ला टायगर्स संघाकडून खेळणारा श्रीलंकेचा फिरकीपटू केव्हिन कोट्ठीगोडा हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू पॉल ऍडम्ससारखाच विचित्र शैलीने गोलंदाजी करत असल्याने चर्चेत आला आहे.

श्रीलंकेचा केव्हिन नवोदित खेळाडू असून त्याने देशांतर्गत स्पर्धेत सरस कामगिरी केली आहे. त्याच्या गोलंदाजीची शैली पॉल ऍडम्सच्या शैलीची आठवण करू देणारी आहे. केव्हिनच्या गोलंदाजीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला लाईक करणाऱ्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.