सिंहगड रोड, धनकवडी, कात्रज, पर्वती भागांत उत्तम प्रतिसाद
पुणे – दि. 9 मे 2020 पासून कॉसमॉस बॅंकेने सर्व ग्राहकांसाठी मोबाइल एटीएम व्हॅन सेवा सुरू केली आहे. करोना महामारीच्या काळात ग्राहकांना सहजतेने आणि सुरक्षितपणे कॅश उपलब्ध व्हावी या हेतूने ही सेवा सुरू केल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष, सीए मिलिंद काळे यांनी दिली.
करोनाच्या संकट काळात ही सेवा सुरू केल्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच ग्राहकांनी या सेवेला उत्तम प्रतिसाद दिला. कोणत्याही बॅंकेच्या एटीएम कार्डद्वारे ग्राहक रोख रक्कम या सेवेअंतर्गत काढू शकतात.
सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसांत कॉसमॉस बॅंकेची मोबाइल एटीएम व्हॅन सेवा सिंहगड रोड, धनकवडी, कात्रज, पर्वती या भागांतील विविध हाऊसिंग सोसायटीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली.
याबाबत अनेक ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. पुणे शहर तसेच पिंपरी, चिंचवड परिसरातही सदर सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती बॅंकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.