पुणे – कॉसमॉस बँकेचे विद्यमान अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी स्वेच्छेने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर ज्येष्ठ संचालक अॅड. प्रल्हाद कोकरे यांची आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली.
अॅड. कोकरे हे डिसेंबर 2004 पासून जवळपास 21 वर्ष बँकेच्या संचालक मंडळात असून 2019-20 व 2020-21 या दोन वर्षात ते बँकेचे उपाध्यक्ष होते.
अॅड. कोकरे हे राज्य सरकारच्या सहकार खात्यामधून सहकारी संस्थांचे सहनिबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत. गेल्या 20 वर्षात संचालकांच्या विविध समित्यांवर तेकार्यरत होते. अॅड. कोकरे हे संचालक म्हणून कायमच खूप सक्रिय राहिले आहेत.