सौंदर्यप्रसाधनांची विक्री पूर्वपदावर!

मुंबई –भारतातील ग्राहक वस्तू बाजारपेठ 4.3 लाख कोटी रुपयांची आहे. जून महिन्यामध्ये ही विक्री वेगाने पूर्वपदावर आली आहे. पण आश्‍चर्याची बाब म्हणजे या तेजीचे नेतृत्व सौंदर्यप्रसाधन साधनांनी केले आहे. 

नेल्सन या संस्थेने या संदर्भातील आकडेवारी संकलित केली आहे. यानुसार 100 अंकांच्या मोजपट्टीवर सौंदर्यप्रसाधनांची विक्री 104 या पातळीवर गेली. मे महिन्यात ही पातळी 72 अंकावर होती. याची कारणमीमांसा करताना विश्‍लेषकांनी सांगितले की, मार्च महिन्यापासून सौंदर्यप्रसाधनांची उपलब्धता कमी झाली होती. त्यामुळे जून महिन्यामध्ये ग्राहकांनी आवश्‍यकतेपेक्षा जास्त खरेदी केली असण्याची शक्‍यता आहे.

सर्व ग्राहक उपयोगी वस्तू या मोजपट्टीवर 98 या अंकावर आहेत. म्हणजे सौंदर्यप्रसाधनांची विक्री सर्वसाधारण विक्रीपेक्षा जास्त झाली. आता बऱ्याच राज्यातील लॉकडाऊन शिथिल झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व विक्री पूर्वपदावर येण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टिकोनातून कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्याचबरोबर पुरवठासाखळी पूर्ववत होण्याची लक्षणे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.