कोर्टी ग्रामपंचायतीवर आ. पाटील गटाचे 12-0 ने चौथ्यांदा वर्चस्व

उंब्रज – कोर्टी, ता. कराड येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक आणि सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक पै. संजय थोरात व सुनील थोरात यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्रि पॅनेलने 12-0 ने दणदणीत विजय मिळवून सलग चौथ्यांदा सत्ता काबिज केली.

या निवडणूकीमध्ये आ. बाळासाहेब पाटील यांनी कोर्टी गावासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यातून स्वच्छ पाण्याची व्यवस्था, संगणकीकृत ग्रामपंचायत इमारत, अद्ययावत लाईट व्यवस्था, घरकूल योजना, महिलांसाठी अनेक प्रशिक्षण वर्ग, कोर्टी-पेरले लक्‍कडवाडा हा 6 कोटी रुपयांचा रस्ता, साकव पूल, शिवारातील पाणंद रस्ते, अंगणवाडी इमारत, पक्‍के रस्ते, गटर्स, सामाजिक सभागृह तसेच गणेशनगर या नवीन वसाहतीसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, अंगणवाडी शाळा खोली, सामाजिक सभागृह, व्यायाम शाळा इमारत बांधून गावाचा चौफेर विकास केलेला आहे. या सर्व विकास कामांमुळेच सत्ताधाऱ्यांकडे ग्रामस्थांनी पुन्हा एक हाती सत्ता सोपविली व झालेल्या विकास कामांची पोहोचपावती दिली.

या निवडणुकीत लोकनियुक्‍त सरपंच सुनिता काटेकर, सुजित यादव, सुनिता थोरात, शहाजी फडतरे, शंकर निकम, प्रमिला थोरात, अंकुश थोरात, रेखा थोरात, सविता कुंभार, रविंद्र निकाळजे, ललिता निकाळजे, शोभा राऊत हे विजयी झाले आहेत.विजयी उमेदवारांसह पॅनेलप्रमुख पै. संजय थोरात, सुनील थोरात व ग्रामस्थांनी आ. बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी आ. पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

यावेळी आ. पाटील म्हणाले, गावाच्या सर्वांगिण विकासासाठी आपआपसांतील मतभेद विसरुन एकत्र यावे, विकास ही न थांबणारी प्रक्रिया असून उर्वरित विकास कामांसाठी कटिबध्द आहे. विजयी उमेदवारांसह पै. संजय थोरात, सुनील थोरात, सागर यादव, वसंतराव यादव, जयवंत थोरात, अजित थोरात, पांडुरंग कदम, दिपक थोरात, सुनिल यादव, दिलीपराव थोरात, धनाजी थोरात, रामचंद्र थोरात, बजरंग थोरात, प्रमोद थोरात, भिमराव थोरात, अशोक शिंदे, निवास थोरात, संजय थोरात, संतोष थोरात, आण्णा कदम, रविंद्र थोरात, किरण पिसाळ, आण्णा बुवा, महेश यादव, अमोल यादव, जयकर थोरात, शैलेश थोरात, जालिंदर घोरपडे, शेखर थोरात, प्रकाश थोरात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.