भ्रष्टाचाराला लगाम घालायला हवा

– संतोष वळसे पाटील

तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात विविध शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चोवीस तासांत दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई. यामुळे तालुक्‍याचे नाव भ्रष्टाचाराबाबत राज्यात बदनाम होत चालले आहे.सामान्य नागरिकांचे पैसे दिल्याशिवाय कोणतेही शासकीय काम होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी दक्ष व स्वावलंबी बनले पाहिजे आणि पैसे मागणाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार देवून भ्रष्टाचाराला आळा घालणे महत्वाचे आहे.

कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच (पैसे) दिली नाही पाहिजे. प्रत्येक शासकीय कामकाज पूर्ण करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली जाते. कोणत्याही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच मागितली तर त्वरीत लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे (टोल फ्री 1064) येथे तक्रार करावी. लाच लुचपत विभागाची कारवाई सहकारी संस्था, बॅंक, बाजार समिती, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, खादी ग्राम उद्योग, ग्रामपंचायत प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू पडते. तसेच संबंधितांच्या विरोधात कारवाई देखील करण्यात येते.

एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर मालमत्ता कमावली असेल तर चौकशी होवून कारवाई होते यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. कोणताही खासगी व्यक्ती अथवा एजंट यांनी पैशांची (लाच) मागणी केल्यास संबंधित अधिकारी अथवा विभागावर कारवाई होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे दूरध्वनी क्रमांक 020-26122134, 9420901906, 1064 स्वतः स्वावलंबी व्हा व तालुक्‍यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पुढे आले पाहिजे. यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. विविध शासकीय खात्यातील अधिकारी कार्यालयात काम न करता घरी शासकीय दप्तर आणून कामे करतात.

तसेच आर्थिक तडजोडीसाठी घरी बोलावून संबंधित नागरिकांचे आर्थिक शोषण केले जाते.अनेकवेळा अधिकारी आणि कर्मचारी नियमाने दिलेले काम नियमात बसत नसल्याचे सांगून आर्थिक शोषण करतात. याबाबत नागरिकांनी दक्ष राहुन भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही, या पद्धतीने काम केले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.