चाकण विकास आराखड्यात भ्रष्टाचार; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा आरोप

चाकण – चाकण विकास आराखड्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून सत्ताधाऱ्यांनर मनमर्जींने अधिकाऱ्यांकडून कामे करून घेतले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष राम गोरे यांच्यासह कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद गायकवाड यांनी केली आहे.
चाकणचा विकास आरखडा पुण्यातील सहायक नगररचना कार्यालयातून तयार करण्यात येत आहे; परंतु या कार्यालयाचे प्रमुख विजय शेंडे यांच्याकडे या कार्यालयाचा अतिरिक्‍त कार्यभार आहे. दरम्यान, शेंडे यांच्याकडून अतिरिक्‍त कार्यभार काढून त्याजागी दि. 8 मार्च 2019 रोजी महिला सहायक संचालक अधिकारी ज. बा. सुर्वे यांची शासनाने बदली केली होती. या बदलीस प्रशासकीय कारण दाखवुन संचालक नगररचना शेंडे यांनी दि. 11 मार्च 2019 रोजीच स्थगिती देऊन सहायक संचालक नगररचना कार्यालय पुणे येथे अतिरिक्‍त कारभार विजय शेंडे यांच्याकडे कायम ठेवलेला आहे.

या सर्व प्रकरणात संशय असून सत्ताधाऱ्यांनी विजय शेंडे यांच्याकडून मनमर्जीने शहरातील जमिनींवर आरक्षण टाकले असून यात संचालक नगररचना शेंडे यांनी शासन बदलीस स्थगिती देऊन विकास आराखाडा विजय शेंडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करून भ्रष्टाचारास साह्य केले आहे. तसेच एका महिला अधिकाऱ्यावरही अन्याय केलेला आहे. या भ्रष्टाचाराची व प्रक्रियेची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी गोरे, गायकवाड यांनी केली आहे. विजय शेंडे यांच्याकडे अतिरिक्‍त कारभार असताना व त्या ठिकाणी शासनाने कायमस्वरूपी अधिकारी नेमल्यानंतर त्यास स्थगिती देऊन उर्वरित चाकण विकास आराखाडा प्रक्रिया राबविण्याची घाईच सांगते यात मोठा भ्रष्टाचार आहे, त्यामुळे विकास आराखड्याचे पुनर्निरीक्षण करून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे गोरे, गायकवाड यांनी सांगितले.

चाकण नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांच्या जमिनीवर आरक्षण टाकुन जो काही भ्रष्टाचार केला त्याची चौकशी झालीच पाहीजे तसेच महिला अधिकारी यांच्या बदलीस स्थगिती देऊन अतिरिक्‍त कारभार असलेल्या अधिकाऱ्यांकडून विकास आराखाडा प्रक्रिया राबविणे यात मोठा भ्रष्टाचार असून आरक्षण व रस्ते यात आर्थिक तडजोडी झाल्या आहेत. याची चौकशी व्हावी विकास आराखाडा कायमस्वरूपी नियुक्‍त महिला अधिकारी यांनीच जाहीर करावा.
– राम गोरे, अध्यक्ष, चाकण शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस

Leave A Reply

Your email address will not be published.