मुंबई – परदेशात नोकरी, पर्यटन किंवा अन्य कोणत्याही कामासाठी जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. पासपोर्ट केंद्रातील रांगा कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षात ही सुविधा सुटसुटीत झाली आहे. त्याचा फायदा पासपोर्टधारकांची संख्या वाढण्यात झाली आहे. या सर्व पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
सीबीआयकडून मुंबई आणि नाशिक परिसरात एकूण 33 ठिकाणी धाडी टाण्यात आल्या आहेत. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीबीआयने शनिवारी मुंबईतील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांवर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुंबई आणि नागपूरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने पासपोर्ट सेवा केंद्र केंद्रांवर संयुक्तपणे छापेमारी केली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड झाला आहे.सीबीआयने आता या प्रकरणासंदर्भात अनेक एफआयआर नोंदवले आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट देण्यात आल्याचा सीबीआयने दावा केला. काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हंटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केले आहेत. त्यामधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.