पालकमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

कैलास शेवाळे हायकोर्टात जाणार
नगर –
भाजप सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून कर्जत-जामखेडचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर शेवाळे यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

या प्रकरणी कर्जत येथील वकील कैलास शेवाळे हे हायकोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी पत्रकार परिषद घेत शेवाळे यांनी माहिती दिली आहे. राम शिंदे यांच्या गैरव्यवहाराबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून, त्यांनी कारवाई न केल्यास कोर्टात जाऊ, असंही ते म्हणाले.

राम शिंदे यांनी त्यांचे वडील शंकर शिंदे यांच्या नावावर चौंडी येथे एक बंगला बांधला आहे. या बंगल्यात स्वत: राम शिंदे राहतात. मात्र हा बंगला बांधत असताना त्यांनी चौंडी ते अरणगाव रस्ता आणि चौंडी ते देवकरवस्ती रस्त्यांवरची 15 आणि 12 मीटर इतक्‍या सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप वकील कैलास शेवाळे यांनी केला आहे. कुठल्याही नियमाप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ठराविक जागा सोडावी लागते. पण राम शिंदे यांनी त्याजागेवर बंगला बांधताना चौंडी ते अरणगाव रस्त्याला केवळ 5 मीटर जागा सोडून बंगला बांधला.

जेव्हा की कायद्यानुसार त्यांनी 15 आणि 12 मीटर जागा दोन्ही बाजूंनी सोडायला हवी होती. तसंच बंगल्याचं मुख्य प्रवेशद्वार हे रस्त्याच्या 15 मीटरच्या आतच आहे आणि त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्रास होतो. अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाता येत नाही, असा आरोप शेवाळे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.