कामाची बातमी | व्हॅक्सिन सर्टिफिकेटवरील चुकीची माहिती घरबसल्या करा दुरुस्त; जाणून घ्या सोपी पद्धत…

How to make changes in vaccine certificate – सरकारच्या कोविन ऍपवर लसधारकांची नोंदणी करताना पत्ता, नाव किंवा जन्मतारीख चुकली असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा आता सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

अनेक ठिकाणी लसीकरणाचे सर्टिफिकेट दाखवावे लागते. प्रवास करतानाहीं त्याचा तपशील बघितला जातो. त्यात बारीकशी जरी चूक झाली असेल तर अनेक ठिकाणी हे सर्टिफिकेट ग्राह्य धरले जात नाही.

कोविन वेबसाईटवर जाऊन सर्टिफिकेटवर दुरुस्ती कशी करायची? जाणून घेऊयात याबाबतची सर्व माहिती…

१) सर्वप्रथम तुमच्या मोबाईल अथवा कॉम्पुटरवर Cowin.gov.in ही वेबसाईट उघडा

२) Cowin.gov.in वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला रजिस्टर/ साइन इन हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.

how to make changes in Vaccine Certificate

३) येथे तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करताना वापरलेला क्रमांक (रजिस्टर्ड मोबाईल नंबर) टाका व सेंड ओटीपी हा पर्याय निवडा. 

how to make changes in Vaccine Certificate ४) वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोविन पोर्टलवरील खात्यात (अकाउंट) प्रवेश मिळेल. तुमच्या अकाउंट डिटेल्स खालोखाल  raise an issue (रेज ऍन इश्यू) पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.

how to make changes in Vaccine Certificate   

५) हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यापुढे What is the issue? असा प्रश्न येईल. तेथे Correction in certificate हा पर्याय निवडा.

how to make changes in Vaccine Certificate

) कोविन पोर्टलवर देण्यात आलेल्या या सुविधेद्वारे तुम्ही तुमच्या लसीकरण प्रमाणपत्रावरील (सर्टिफिकेट) नाव, जन्मवर्ष व लिंग यांमधील कोणत्याही दोन गोष्टींमध्ये बदल करू शकता. या सुविधेचा लाभ केवळ एकदाच घेता येतो.

७) तुम्हाला सर्टिफिकेटवरील जी माहिती बदलायची आहे, त्यापुढे क्लिक करा. यानंतर Continue हा पर्याय निवडून पुढे जा.

how to make changes in Vaccine Certificate८) तुमच्यापुढे बदल करावयाची माहिती येईल. तेथे तुम्हाला जी माहिती अद्ययावत करायची आहे ती भरा. 

अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या लसीकरण प्रमाणपत्रात (व्हॅक्सिन सर्टिफिकेट) घरबसल्या दुरुस्ती करू शकता.        

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.