मालेगाव – शिवसेनेच्या नगरसेविका तथा प्रभाग क्र. एक च्या माजी सभापती कविता किशोर बच्छाच यांचे शनिवारी रात्री कोरोनाने निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कविता यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आला होता. सौम्य लक्षणे जाणवत असल्याने घरीच उपचार सुरू होते. शनिवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलविले. मात्र तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.