मनपाच्या अन्नछत्राने आठ दिवसांत 19 हजार जणांची भागवली भूक

नगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या पुढाकारातून सावेडी उपनगर येथील हॉटेल संजोग व कल्याण रोड परिसरात अन्नछत्र उभारण्यात आले आहे. त्यामाध्यमातून दररोज 2 हजार फूड पॅकेट वितरीत केले जात आहे. गेल्या आठ दिवसात मनपाच्या अन्नछत्रात अंदाजे 19 हजार जणांणी भूक भागवली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच लॉकडाऊन असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सावेडी, नागापूर, बोल्हेगाव, तपोवन रस्ता, अकाबर नगर, ढवण वस्ती, एमआयडीसी परिसरात अनेक नागरिकांचे हातावर पोट आहे. तसेच कल्याण रस्त्यावर ही मनपाच्या वतीने अनछत्र उघडण्यात आले आहे. त्यामध्ये 1 हजार नागरिकांना फूड पॅकेट देण्यात येत आहे. त्यासाठी पाच ते सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याद्वारे हे फूड पॅकेट वितरीत केले जात आहे. या उपक्रमध्ये आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभत आहेत. त्यामुळे अनेक गरजु नागरिकांना फूड पॅकेटचे वितरण करण्यात येत आहे.

सर्वत्रच लॉकडाऊन असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच परप्रांतीय नागरिक शहरामध्ये अडकले आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांच्यासाठी मनपा प्रशासनाने सावेडी उपनगरात संजोग हॉटेल येथे अन्नछत्र उघडण्यात आले. तेव्हा सुरुवातील मागणी नुसार फुड पॅकेटचे वितरण करण्यात येत होते. आता मागणी वाढली असून पासून दररोज 1 हजार बाराशे फूड पॅकेट तयार करून नागरिकांना देण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.