कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धा | स्पार्टन क्‍लब अंतिम फेरीत

पुणे – पहिल्या अयोध्या वॉरीयर्स करंडक अजिंक्‍यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत प्रतीक लव्हळेकर याच्या अष्टपैलू खेळीमुळे स्पार्टन क्रिकेट क्‍लबने ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्‍लब संघाचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्‍लबने फलंदाजीचा निर्णय घेतला. ग्लोबल संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 159 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्पार्टन क्रिकेट क्‍लबने सावध सुरुवात केली.

सलामीवीर भूषण सवे याने 26 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 51 धावांची खेळी केली. प्रतीक लव्हळेकर (38 धावा) व परिचर वझे (27 धावा) यांनी दुसऱ्या बाजूने साथ देत संघाला 18.1 षटकात व 5 गडी गमावून संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

उपांत्य फेरी : ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्‍लब : 20 षटकात 9 बाद 159 धावा. (प्रिन्स अरोरा 33, मनीष शेजवाल 32, विवेक कुबेर 2-16, निखील भोगले 2-24) पराभूत वि. स्पाटर्न क्रिकेट क्‍लब : 18.1 षटकात 5 बाद 160 धावा. (भुषण सवे 51, प्रतीक लव्हळेकर 38, परीचर वझे 27, शशांक जोशी 3-18, पुरूषोत्तम खांडभराड 2-25). सामनावीर ः प्रतिक लव्हळेकर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.