पुणे – कर्मा 9 स्पोर्टस यांच्या तर्फे कर्मा 9 टी-20 कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेचे आजपासून आयोजन करण्यात आले असून यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील 16 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा लिजेंड्स क्रिकेट मैदानावर दर शनिवार व रविवारी होणार आहे.
स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले असून यामध्ये मार्क्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड, व्हर्च्युअल सिमटेक, कॉसमॉस, स्पायडर स्पोर्टस, चॅम्पियन्स इलेव्हन, ब्राईट इलेव्हन, ए अँड आय डायजेस्ट, ट्रोजन्स, पुणे क्रिकेट अकादमी, टायटन्स, पुणे रॉयल स्ट्रायकर्स, कॅटालिस्ट, मेडीकोज, पुणे हरिकेन्स, अयोध्या वॉरीयर्स, गुड बॅड गुगली यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. तसेच, साखळी फेरीत प्रत्येक संघ 3 सामन खेळणार असून प्रत्येक गटांतील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 35 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 25 हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.