पुणे – पहिल्या अयोध्या वॉरियर्स करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्लब आणि ऍलिक्सिअर मेडिकल सिस्टीम्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या बाद फेरीकडे वाटचाल केली.
कटारिया हायस्कूल, मुकुंदनगर व कोद्रे फार्मस्, सिंहगड रोड मैदानावर झालेल्या सामन्यात शशांक जोशी याच्या अष्टपैलू खेळीमुळे ग्लोबल वॉरियर्स संघाने शिवनेरी क्रिकेट क्लबचा 4 गडी राखून सहज पराभव केला आणि बाद फेरीतील आपले स्थान भक्कम केले. शिवनेरी संघाचा डाव पहिल्यांदा फलंदाजी करताना 19.4 षटकांत व 119 धावांवर आटोपला. ग्लोबल संघाच्या मध्यमगती गोलंदाज शशांक जोशी याने 25 धावांत 3 गडी टिपले, तर सुजित उबाळे याने 2 गडी बाद केले.
हे आव्हान ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्लबने 12.3 षटकांत व 6 गडी गमावून पूर्ण केले. ऍलिक्सिअर मेडिकल सिस्टीम्स् संघाने स्कॉर्पियन क्रिकेट क्लबचा 43 धावांनी पराभव केला. ऍलिक्सिअर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 217 धावांचे आव्हान उभे केले. स्कॉर्पियन क्रिकेट क्लबला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 19.2 षटकांत 174 धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक –
गट साखळी फेरी – 1) शिवनेरी क्रिकेट क्लब : 19.4 षटकांत सर्वबाद 119 धावा. (हिमांशू अगरवाल 21, सुमित खोले नाबाद 20, शशांक जोशी 3-25, सुजित उबाळे 2-19) पराभूत वि. ग्लोबल वॉरियर्स क्रिकेट क्लब ः 12.3 षटकांत 6 बाद 120 धावा. (पुरुषोत्तम खंडेभराड 31, अभिषेक खंबाटे 18, शशांक जोशी नाबाद 14, तुषार माडीवाले 3-24). सामनावीर ः शशांक जोशी.
2) ऍलिक्सिअर मेडिकल सिस्टीम्स् : 20 षटकांत 5 बाद 217 धावा. (वासिम सय्यद 90, विपूल खैरे 63, शैलेश सावंत 2-33) वि.वि. स्कॉर्पियन क्रिकेट क्लब ः 19.2 षटकांत सर्वबाद 174 धावा. (ओंकार शिंदे 78, अजिंक्य जोशी 17, विपूल खैरे 2-31, दीपक डांगी 2-26). सामनावीर ः विपूल खैरे.