पुणे – पहिल्या आयोध्या वॉरीयर्स करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत हितेश माल याच्या भेदक गोलंदाजीमुळे शिवनेरी क्रिकेट क्लबने एल. के. इलेव्हन संघाचा 13 धावांनी पराभव करून आगेकूच केली.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना शिवनेरी क्रिकेट क्लबने 20 षटकात 5 गडी गमावून 190 धावांचे आव्हान उभे केले.
एल. के. इलेव्हन संघाची आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाने 35 धावात 4 गडी गमावले होते. एल.के. इलेव्हन संघाचा डाव 20 षटकात 7 गडी गमावून 177 धावांवर मर्यादित राहिला.
संक्षिप्त धावफलक –
गटसाखळी फेरी – शिवनेरी क्रिकेट क्लब ः 20 षटकात 5 बाद 190 धावा. (धनाजी काळके 45, विनायक शिंत्रे 36, इम्तियाझ शेख 27, गणेश मिसाळ 21, अपुर्व दराडे 2-16) वि. वि. एल.के. इलेव्हन – 20 षटकात 7 बाद 177 धावा. (केतन बापट 69, विराज पानसरे नाबाद 30, हितेश माल 3-27, वैभव पाटील 2-40). सामनावीर – हितेश माल.